कारंजा हँडबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:40 IST2017-09-12T01:39:57+5:302017-09-12T01:40:04+5:30
२१ वी पश्चिम विभागीय पुरु ष व महिला राष्ट्रीय स्पर्धा अंबाजी व्हिलेज अबु रोड गुजरात येथे १७ स प्टेंबर ते २0 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र राज्याची संघ निवड चाचणी स्पर्धा शनिवार ३ सप्टेंबर रोजी महात्मा फुले, रुखमे नगर अहमद पुर जि.लातुर येथे लातुर जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन व हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडली. यामध्ये कारंजा चमुची निवड झाली आहे.

कारंजा हँडबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : २१ वी पश्चिम विभागीय पुरु ष व महिला राष्ट्रीय स्पर्धा अंबाजी व्हिलेज अबु रोड गुजरात येथे १७ स प्टेंबर ते २0 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र राज्याची संघ निवड चाचणी स्पर्धा शनिवार ३ सप्टेंबर रोजी महात्मा फुले, रुखमे नगर अहमद पुर जि.लातुर येथे लातुर जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन व हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडली. यामध्ये कारंजा चमुची निवड झाली आहे.
सदर निवड चाचणी स्पर्धेमध्ये आपल्या संत गजानन महाराज हॅडबॉल क्लब तथा दि.हँडबाूल असोसिएशन ऑफ वाशिम डिस्ट्रीकच्या ७ खेळाडूंनी निवड चाचणी स्पर्धेमध्ये भाग घे तला होता. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातुन आलेल्या खेळाडूमधून १६ खेळाडूंचा संघ निवड समितीव्दारे निवडण्यात आला. हँडबाूल असोसिएशनचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी जनरल रणधिरसिंग व सहसचिव सुदेश मालप यांनी महाराष्ट्राचा संघ जाहीर केला. महाराष्ट्र राज्याच्या महिला हँडबॉल संघामध्ये आपल्या क्लबच्या नंदीनी कटारीया, ऋ तुजा दत्तात्रय देशमुख यांची निवड झाली. अक्षया सुनिल सुडके व चिन्मयी संतोष धोटे या दोन मुलींनी राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पुरुष हँडबॉल संघामध्ये आपल्या क्लबचा शुभम प्रेमसिंग चव्हाण, याची राखीव खेळाडू म्हणुन निवड झालेली आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर १३ सप्टेंबर रोजी पासून मुंबई येथे हँडबॉलचे आंतर राष्ट्रीय खेळाडू वैभव वाघ व देवेंद्र चौघुले यांच्या मार्गदर्शनात पार पडणार आहे. महाराष्ट्राचा संघ स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता १६ सप्टेंबर रोजी गुजरात येथे जाण्याकरिता रवाना होणार आहे. नंदीनी कटारीया, ऋतुजा देशमुख, चिन्मयी धोटे, स्थानिक आर.जे.सी.चवरे, कारंजा ची विद्यार्थीनी असुन अक्षया सुडके ही स्थानिक जे.सी.स्कुल कारंजाच्या विद्यार्थीनी आहे. तसेच शुभम प्रेमसिंग चव्हाण क्लबचा खेळाडू असुन वरील सर्व खेळाडू नियमितपणे हँडबॉल या खेळाचा तालुका क्रिडा संकुल कारंजा येथील हॅडबाूलच्या मैदानावर सराव करतात. खेळाडूंची निवड झाल्यामुळे कारंजा नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा गोवला गेला आहे. या निवडीमुळे निश्चितच वाशिम जिल्ह्यात हँडबॉल खेळाचा प्रसार करण्यास मदत होईल. सदर खेळाडूंची सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. निवड झालेल्या सर्व मुलींनी आपल्या निवडीचे श्रेय आपले आई वडील प्रशिक्षक प्रशांत महल्ले, पराग गुल्हाणे, दर्शन रोकडे, शुभम चौधरी, स्वप्नील महाजन, सचिव राहुल गावंडे यांना देत आहे. हँडबॉल असोसिएशन वाशिमचे अध्यक्ष देवेंद्र पाटील ताथोड, उपाध्यक्ष गोपाल पाटील भोयर, राजुभाऊ मते, सहसचिव विनोदभाऊ कडु, बॉस्केट बॉल, असोसिएशनचे सचिव शशिभाऊ नांदगावकर, राजुभाऊ अढाऊ, भरत हरसुले, विवेक गहाणकरी, दिनेश पळसकर, वसंतराव साबळे, सुनिल सुडके, डॉ.संतोष धोटे, सनि राऊ त, दिनेश धारपवार, रंजीत रोतेले, राजेश शेंडोकार , राम धर्माधिकारी, दुर्गेश मिसाळ, धिरज डहाके, धिरज कातखेडे, यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे कौतुक होत आहे.