कार झाडावर धडकून एक ठार
By Admin | Updated: January 31, 2017 15:31 IST2017-01-31T15:31:26+5:302017-01-31T15:31:26+5:30
जोगलदरी फाटयाजवळ डस्टर क्रमांक एम.एच.२८ ए .एन.३१११ क्रमांकाच्या कारने झाडाला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना

कार झाडावर धडकून एक ठार
ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. 31 - येथून जवळच असलेल्या जोगलदरी फाटयाजवळ डस्टर क्रमांक एम.एच.२८ ए .एन.३१११ क्रमांकाच्या कारने झाडाला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.
बुलढाणा जिल्हयातील खामगावचे रहिवासी नरेश रमेश राठी (४०) हे मानोरा येथील त्यांचे नातेवाईकांना भेटण्याकरिता जात असतांना हा अपघात घडला. वाहन स्वत: नरेश राठी गाडी चालवत असतांना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळली,ज्यात गाडीचा चुराडा झाला तर नरेश राठी हे मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावले. बाजुला बसलेले गाडीचालक यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत