कत्तलीसाठी गायींना घेवून जाणारे वाहन पकडले
By Admin | Updated: January 23, 2017 20:42 IST2017-01-23T20:42:19+5:302017-01-23T20:42:19+5:30
येथून दिग्रसकडे जाणाऱ्या मिनी ट्रकमध्ये अवैधरित्या सहा गायींना कोंबून कत्तलीसाठी जाणारे वाहन पोलिसांनी

कत्तलीसाठी गायींना घेवून जाणारे वाहन पकडले
>ऑनलाइन लोकमत
मानोरा, दि. 23 - येथून दिग्रसकडे जाणाऱ्या मिनी ट्रकमध्ये अवैधरित्या सहा गायींना कोंबून कत्तलीसाठी जाणारे वाहन पोलिसांनी तालुक्यातील विठोली येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपी वाहनचालकास अटक करण्यात आली आहे. सोमवार, २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी मानोरा येथे गुरांचा बाजार भरतो. तेथूनच ६ गायी विकत घेवून त्या एम एच ३८ -११०१ या मिनी ट्रकमध्ये अत्यंत निर्दयपणे कोंबून दिग्रसकडे नेत असल्याची बाब अभिषेक गणेश चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या सहकार्याने गायी विठोली येथे बांधून ठेवल्या व मिनीट्रक जप्त करून वाहनचालकास अटक केली. याप्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई झालेली नव्हती. पुढील तपास बीट जमादार सुभाष महाजन, संदिप बरडे करत आहेत.