वाशिममध्ये कँडल रॅली
By Admin | Updated: September 7, 2014 03:06 IST2014-09-07T03:06:59+5:302014-09-07T03:06:59+5:30
युगच्या हत्येचा केला निषेध, मारेकर्यांना फाशीची मागणी.

वाशिममध्ये कँडल रॅली
वाशिम : नागपुरच्या लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील युग चांडक या ८ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण व हत्येप्रकरणी वाशिम येथे सर्वधर्मीय समाजबांधव, सामाजिक संघटनांच्यावतीने कँडल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
स्थानिक पाटणी चौकातून सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास ही कँडल रॅली सुरु करण्यात आली. तिचा शिवाजी चौकात झालेल्या श्रध्दांजली सभेने समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये शहरातील लहान बालकांपासून महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, व सर्व जा तीधर्माचे समाजबांधव सहभागी झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती होउ नये यासाठी त्याच्या मारेकर्यांना त्वरीत फाशिची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही या श्रध्दांजलीपर सभेतून करण्यात आली. युग चांडकची हत्या केवळ द्वेषभावनेतून केल्याचे समोर आल्याने ही बाब बिघडत्या सामजिक विकृतीचे दर्शन घडवित असल्याच्या भावना कँडल रॅलीत सहभागी नागरिकांनी बोलून दाखविल्या