खर्च तपशिलाची उमेदवारांनी घेतली माहिती

By Admin | Updated: February 28, 2015 00:58 IST2015-02-28T00:58:32+5:302015-02-28T00:58:32+5:30

३३ उमेदवारांची वाशिम जिल्हा निबंधक कार्यालयाकडे धाव

Candidates of expenditure details taken | खर्च तपशिलाची उमेदवारांनी घेतली माहिती

खर्च तपशिलाची उमेदवारांनी घेतली माहिती

वाशिम : निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराने निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाचा दैनंदिन तपशील सादर करणे बंधनकारक असतांना निवडणुक रिंगणात असलेल्या एकाही उमेदवारांच्यावतिने २५ फेब्रुवारीपर्यंंत सादर करण्यात आला नव्हता. यासंदर्भात लोकमतने २७ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच निवडणुकीतील तीन पॅनलच्या ३३ उमेदवारांनी जिल्हा निबंधक कार्यालय गाठून निवडणूक खर्च सादर करण्याची पध्दत व तपशिलाची माहिती घेतल्याचे जिल्हा निबंधक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. जि.प.वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था वाशिम र.जि. रं.३0९ च्या ११ संचालक पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीत तब्बल ६0 जण आपले भाग्य अजमावितांना दिसून येत आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 चे कलम ७३ कब व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २0१४ चे नियम ६५ व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास सर्मथ करणार्‍या इतर सर्व अधिकारांचा वापर करून सहकारी संस्थांच्या समितीची निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीसाठी झालेला खर्चाचा दैनंदिन तपशील भाग २ मध्ये निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे पुढील दिवसाच्या दुपारी २ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

Web Title: Candidates of expenditure details taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.