मतदारांच्या भेटीवर उमेदवारांचा जोर
By Admin | Updated: September 29, 2014 02:22 IST2014-09-29T02:22:37+5:302014-09-29T02:22:37+5:30
वाशिम जिल्हयातील तीनही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मतदारांच्या भेटीवर जोर.

मतदारांच्या भेटीवर उमेदवारांचा जोर
वाशिम: आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीवर जोर दिला असून दररोज सकाळी उठून गाडयांच्या ताफयासह मतदारांची भेट घेतांना दिसून येत आहेत. मतदारांची भेट घेताना मात्र पूर्वी ज्याप्रमाणे पदाधिकार्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी राहायची ती गर्दी आघाडी व महायुतीच्या घटस्स्फोटामुळे रोडावली असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्हयातील तीन विधानसभा मतदार संघात निवडणुक वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून उमेदवारांचे फोन स्विच ऑफ मोठया प्रमाणात येत आहेत. फोन सुरू झाल्यानंतर येणार्या मॅसेजव्दारे कोणी फोन केले हे तपासून महत्वाच्या लोकांनाच रिप्लाय देण्यात येत आहे. जिल्हयातील प्रत्येक गावात त्या त्या मतदार संघातील नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी आतापासून सुरू केल्या असल्या तरी काही जणांनी अद्याप मतदारांच्या भेटी घेणे सुरू केलेल्या नाही त. आघाडी व महायुती तुटल्याने यामधील दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने अनेक अडचाणींना उमेदवारांना सामोरे जावे लागत आहे.