उमेदवार परीक्षेपासून वंचित

By Admin | Updated: November 9, 2014 01:08 IST2014-11-09T01:08:18+5:302014-11-09T01:08:18+5:30

हॉल तिकिटे जप्त केली, वाशिम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांमध्ये रोष.

The candidates are deprived of the examination | उमेदवार परीक्षेपासून वंचित

उमेदवार परीक्षेपासून वंचित

वाशिम - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्ग ड प्रकारातील शिपाई व चौकीदार पदभरतीच्या झालेल्या लेखी परीक्षेमध्ये भाग घेण्यासाठी वाशिम जिल्हय़ातून व बाहेरगावावरुन आलेल्या २0 ते २५ उमेदवारांजवळून ऐनवेळेवर कारणे सांगुन परीक्षा केंद्रप्रमुख पाडेवार यांनी उमेदवारांजवळून हॉल तिकीट जप्त केले व त्यांना हाकलून लावण्याचा प्रकार आज (दि.८) रोजी सकाळी ११.३0 वाजता घडला. त्यामुळे उपस्थित उमेदवारांमध्ये एकच गोंधळ उडून उमेदवारांमध्ये तीव्र रोष पसरला. ही बाब छावा संघटना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे पदाधिकारी मनिष डांगे, सतीश जाधव, संतोष घुगे, ब्रम्हदेव बांडे यांना माहीत पडताच त्यांनी परीक्षा केंद्रावर जावून परीक्षा केंद्रप्रमुखाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र परीक्षा संपेपर्यंत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकाही जबाबदार अधिकार्‍यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे मनिष डांगे यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला व या प्रकाराबाबत ठाणेदार संग्राम सांगळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर उपनिरीक्षक हिवरकर, जाधव, पोहेकॉं. राजू वानखेडे, धनंजय पवार, प्रियंका लाटे व गोपनीय शाखेचे रमेश पाटील आदींनी परीक्षा स्थळी धाव घेऊन उमेदवारांना शांत केले व परीक्षा केंद्रप्रमुखांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांची हॉल तिकिटे परत मिळाली; मात्र जबाबदार अधिकार्‍यांच्या आडमुठ्या धोरणामुळे परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेपासून वंचित राहावे लागले व त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: The candidates are deprived of the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.