‘हिंसा के खिलाफ-मानवता की ओर’ अभियान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 19:32 IST2017-08-18T19:32:09+5:302017-08-18T19:32:43+5:30

वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या नावाने अभियानाचे नियोजन असून, याअंतर्गत रविवार, २० आॅगस्ट रोजी वाशिम शहरात निर्भय मॉर्निंग वॉक रॅली व स्वाक्षरी मोहिम राबविली जाणार आहे. 

Campaign against 'violence against humanity' campaign! | ‘हिंसा के खिलाफ-मानवता की ओर’ अभियान !

‘हिंसा के खिलाफ-मानवता की ओर’ अभियान !

ठळक मुद्दे२० ला निर्भय मॉर्निग वॉक रॅली स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या नावाने अभियानाचे नियोजन असून, याअंतर्गत रविवार, २० आॅगस्ट रोजी वाशिम शहरात निर्भय मॉर्निंग वॉक रॅली व स्वाक्षरी मोहिम राबविली जाणार आहे. 
सकाळी ६ वाजता शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून  ‘निर्भय मॉर्निग वॉक’ ही रॅली पाटणी चौकाकडे मार्गस्थ होईल. डॉ. आंबेडकर चौकामध्ये रॅली आल्यानंतर तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन संविधान विरोधी कार्य करणाºया शक्तिचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे, प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी १० ते ५ या वेळेत डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविली जाईल. त्यानंतर २१ आॅगष्टला दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती व राज्यपालांना निवेदन पाठविले जाईल.
या निर्भय मॉर्निग वॉक व जबाब दो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व  समविचारी पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून डॉ. रामकृष्ण कालापाड, डॉ. एम. बी. डाखोरे, पी. एस. खंदारे, प्राचार्य सुभाष अंभोरे, अ‍ॅड. दिपाली सांबर आदींनी केले आहे.

Web Title: Campaign against 'violence against humanity' campaign!