जातीनिहाय मतांची आकडेमोड सुरू
By Admin | Updated: October 14, 2014 01:46 IST2014-10-14T01:46:45+5:302014-10-14T01:46:45+5:30
वाशिम जिल्ह्यातील राजकारणातही जात फॅक्टर आजतागायत प्रभावी.

जातीनिहाय मतांची आकडेमोड सुरू
रिसोड (वाशिम): राजकारणात जात हा फॅक्टर आजतागायत प्रभावी ठरल्याचे समोर आले आहे. जातीनिहाय मतांवर उमेदवारांच्या राजकीय भवितव्याच्या गणिताची जुळवाजुळव केली जाते. यंदा तर तिकीट वाटपापासून मतदान होईपर्यंंत जातनिहाय मतदानाची बेरीज-वजाबाकी या दोन गणितीय क्रिया सातत्याने सुरू असल्याने राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. तथापि, शेवटच्या टप्प्यात कुण्या जातीचे किती मतदान आहे, याची आकडेमोड सुरू झाली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात अंदाजानुसार मराठा समाज सर्वात मोठा आहे. त्यापाठोपाठ वंजारी समाजाचा नंबर लागतो. त्यामुळे बहुतांश प्रमुख पक्षांनी मराठा समाजाचे उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाचे चार उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच वंजारी समाजाच्या उमेदवारासह विविध जातीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून , त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी ही मते आपल्याला कशी मिळवता येतील, या दृष्टीने कार्यकर्त्यांंवर जबाबदारी सोपवली आहे. कुण्या उमेदवाराच्या पारड्यात कोणत्या समाजाच्या किती मतदारांचे मतदान पडेल, याचे आडाखे बांधले जात आहेत. मतदानाची तारीख जशीतशी जवळ येत आहे, तसतसा राजकारण तापत चालले आहे.