कारागृहांसाठी होणार फॉगिंग मशिनची खरेदी
By Admin | Updated: September 12, 2014 00:23 IST2014-09-11T22:48:37+5:302014-09-12T00:23:20+5:30
राज्यातील सर्व ३८ कारागृहांमध्ये फॉगिंग मशीन (धुरळणी यंत्र) खरेदी केल्या जाणार.

कारागृहांसाठी होणार फॉगिंग मशिनची खरेदी
खामगाव : कारागृहात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व ३८ कारागृहांमध्ये फॉगिंग मशीन (धुरळणी यंत्र) खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी १८ लाख ३१ हजार रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे.
राज्यात मध्यवर्ती, जिल्हा तसेच खुले असे एकूण ३८ कारागृह आहेत. या कारागृहांमध्ये वैद्यकीय सुविधा पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्य योजनेच्या मंजूर तर तुदीमधून प्रत्येक कारागृहासाठी एक याप्रमाणे एकूण ३८ फॉगिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. राज्यातील मध्यवर्ती कारागृहे व तसेच कोल्हापूर, सोलापूर अकोल्यासह अन्य जिल्हा कारागृहांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.