लोणी खु. येथे १० जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:39 IST2021-05-17T04:39:05+5:302021-05-17T04:39:05+5:30
प्राप्त माहितीनुसार, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गुरांना गायरान जमिनीवर चरण्यासाठी सोडले जाते. त्यानुसार, संबंधित पशुपालकांची जनावरे चरत असताना दुपारच्या ...

लोणी खु. येथे १० जनावरांचा मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गुरांना गायरान जमिनीवर चरण्यासाठी सोडले जाते. त्यानुसार, संबंधित पशुपालकांची जनावरे चरत असताना दुपारच्या सुमारास १० जनावरांचा अचानक मृत्यू झाल्याची बाब समाधान गाडे व अन्य पशुपालकांच्या लक्षात आली. गाडे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या डाॅ. धारपवाड, डाॅ. देबाजे यांना याबाबत अवगत केले. संबंधितांसह डाॅ. महाजन, सरपंच अरविंद गाडे, संजय गाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेत विष्णू गाडे, रवि गाडे, विश्वनाथ पारवे, काशिनाथ सोनुने, जीवन गाडे, गजानन गाडे आदी पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेची दखल घेत प्रशासनाने संबंधित पशुपालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने केली आहे.