बसफेऱ्या अनियमित; प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:37 IST2021-04-05T04:37:01+5:302021-04-05T04:37:01+5:30
वाशिम ते रिसोड मार्गावर वाशिम आगाराच्या १० पेक्षा अधिक बसफेऱ्या सुरू आहेत. दर अर्धा, एक तासाला या मार्गावर एसटीची ...

बसफेऱ्या अनियमित; प्रवाशांची गैरसोय
वाशिम ते रिसोड मार्गावर वाशिम आगाराच्या १० पेक्षा अधिक बसफेऱ्या सुरू आहेत. दर अर्धा, एक तासाला या मार्गावर एसटीची बस धावताना दिसते. या बसफेऱ्यांचा मार्गावरील गावच्या ग्रामस्थांना मोठा आधार असतो. या सर्व बसफेऱ्या सध्याही सुरू आहेत; परंतु रिसोडहून वाशिम या वेळेत जाणाऱ्या फेऱ्या परतीच्या प्रवासात तास, दीड तास विलंबाने येत आहेत. त्यामुळे या बसफेऱ्यांवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांची पंचाईत झाली असून त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
00000000000000000
वीजतारांना अडसर ठरणारी झाडे तोडण्याची मागणी
वाशिम: झुकलेले विद्युत खांब आणि लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करून झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब झुकलेले आणि तारा लोंबकळत असतानाच तारांना झाडांच्या फांद्या छेदत आहेत. त्यातच अनेक रोहित्रही गंभीर स्थितीत आहेत. एखादवेळी अपघात घडून शेतकरी, कामगार, गुरांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो.