बस कर्मचारी संपावर; प्रवासी वा-यावर!
By Admin | Updated: December 18, 2015 02:33 IST2015-12-18T02:33:50+5:302015-12-18T02:33:50+5:30
लोकवाहिनी ठप्प ; खासगी वाहने हाऊसफुल्ल, महामंडळाचे १६ लाखांचे उत्पन्न बुडाले!

बस कर्मचारी संपावर; प्रवासी वा-यावर!
वाशिम: कामगार करार रद्द करून २५ टक्के पगारवाढ मिळण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांकरिता महाराष्ट्र एसटी वर्कर काँग्रेसने (इंटक) १७ डिसेंबरला संपाची हाक दिली. या संपात जिल्हय़ातील चार आगारातील जवळपास ८00 कर्मचार्यांनी सहभाग घेतल्याने गुरुवारी लोकवाहिनी ठप्प राहिली. परिणामी, प्रवाशांची धांदल उडून खासगी वाहनांची चांदी झाली. औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार २0१२-१६ रद्द करून २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मुख्य मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकरिता राज्यभरातून परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कामगार आयुक्त आदींकडे ५३ हजार ५0३ कर्मचार्यांनी आतापर्यंंत निवेदन दिले; मात्र संबंधितांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने गुरुवारी राज्यभर एसटी वाहक, चालक व कर्मचारी संपावर गेले. या संपात वाशिम जिल्हय़ातील वाशिम, कारंजा, मंगरुळपीर व रिसोड या चार आगारातील जवळपास ८00 कर्मचारी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते, अशी माहिती संघटनेचे विभागीय सचिव वाय.के.इंगोले यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. वाशिम आगारातून मानव विकास मिशनच्या १४ पैकी १२ बसेस धावल्या. अन्य ४0 पैकी एकही बस धावली नाही. मंगरुळपीर आगारातून मानव विकास मिशनच्या पाच बसेस धावल्या असून, अन्य एकही बस धावली नाही. रिसोड आगारातून मानव विकास मिशनच्या दोन फेर्या केशवनगर व गोभणी येथे धावल्या. वाशिम व वाढोणा अशा दोन प्रवासी फेर्या धावल्या. कारंजा आगारातून मानव विकासच्या बसेसचा अपवाद वगळता एकही बस धावली नाही.