बसच्या धडकेत इसम ठार
By Admin | Updated: September 26, 2014 00:40 IST2014-09-26T00:40:00+5:302014-09-26T00:40:00+5:30
नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर कुपसा फाट्यावरील घटना.

बसच्या धडकेत इसम ठार
शिरपूर जैन (वाशिम): राज्य परिवहन महामंडाळाच्या बसची धडक लागुन एक इसम जागीच ठार झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर कुकसा फाट्यानजीक २४ सप्टेंबर रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार भिमराव गणपत सावळे (रा. कोयळी ता. रिसोड) हा इसम सायकलने त्याच्या गावी जात असताना वाशिमहून औरंगाबादकडे जाणार्या बस क्रं. एम.एच. ४0 एन. ९६२९ जबर धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेले भिमराव सावळे याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी संदिप सावळे यांनी शिरपूर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध कलम २७९, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल करुन एस.टी. बस ताब्यात घेतली आहे.