तुरीची गंजी जळून खाक, एक लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:14+5:302021-01-13T05:45:14+5:30
काजळेश्वर उपाध्ये : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील महिला शेतकरी अंजनाबाई शंकरराव फरास यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला ११ जानेवारी रोजी ...

तुरीची गंजी जळून खाक, एक लाखाचे नुकसान
काजळेश्वर उपाध्ये : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील महिला शेतकरी अंजनाबाई शंकरराव फरास यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला ११ जानेवारी रोजी दुपारी आग लागल्यामुळे गंजी जळून खाक झाली. यात महिला शेतकरी अंजनाबाई यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करून शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
काजळेश्वर येथील महिला शेतकरी अंजनाबाई शंकरराव फरास यांच्या सर्व्हे क्रमांक १४० मधील शेतात सहा एकर क्षेत्रातील तुरीची कापणी करून गंजी लावण्यात आली होती. या तुरीची काढणी करण्यासाठी त्या मळणीयंत्राची व्यवस्था करीत होत्या. अशातच ११ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास या गंजीला अचानक आग लागली. ही माहिती अंजनाबाई फरास यांचा मुलगा राजू फरास याला मिळताच त्याने शेताकडे धाव घेतली; परंतु तो शेतात पोहोचण्यापूर्वीच संपूर्ण गंजी जळून खाक झाली. यात अंजनाबाई फरास यांचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी प्रशासनाने करून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी अंजनाबाई फरास आणि काजळेश्वर येथील शेतकरी संघर्ष मंचचे विनोद उपाध्ये यांनी केली आहे.
===Photopath===
120121\12wsm_1_12012021_35.jpg
===Caption===
तुरीची गंजी जळून खाक