‘इव्हीएम मशीन’ची प्रतिमा जलाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST2021-05-16T04:39:45+5:302021-05-16T04:39:45+5:30
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. युवकांच्या समस्या सोडविण्याबाबत उदासीनता बाळगण्यात ...

‘इव्हीएम मशीन’ची प्रतिमा जलाओ आंदोलन
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. युवकांच्या समस्या सोडविण्याबाबत उदासीनता बाळगण्यात येत आहे. निवडणुकीत वापरली जाणारी इव्हीएम मशीनही पारदर्शक नसल्याचा आरोप भारतीय युवा व बेरोजगार मोर्चाने केला आहे. गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून सतत बंद ठेवला जात असल्याने बेरोजगारीत वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात प्रत्येक दिवसाला ३८ बेरोजगार आत्महत्या करत आहे. त्यास शासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचा मुद्दा समोर करून भारतीय बेरोजगार मोर्चाने आंदोलन पुकारले असून दुसऱ्या टप्प्यात १२ मे रोजी इव्हीएम मशीनची प्रतिमा जलाओ आंदोलन करण्यात आले, अशी माहिती ‘आरएमबीकेएस’चे तालुका संयोजक उत्तम सोळंके यांनी दिली.