पोहरादेवी येथे घरफोडी

By Admin | Updated: July 9, 2016 00:54 IST2016-07-09T00:54:05+5:302016-07-09T00:54:05+5:30

मानोरा तालुक्यात चोरीच्या घटनात वाढ.

Burglary at Pohardevi | पोहरादेवी येथे घरफोडी

पोहरादेवी येथे घरफोडी

मानोरा (जि. वाशिम): पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोहरादेवी येथील उत्तम लक्ष्मण परांडे यांच्या घरातील पेटीमधून रोख २0 हजार रुपये व ३ हजार २00 रुपयाचे चांदीच्या पट्या असा २३ हजार २00 रुपयाचा माल अज्ञात चोरट्य़ाने चोरुन नेल्याची घटना ७ जुलैला दिवसा घडली. घटनेची फिर्याद उत्तम परांडे यांनी मानोरा पोलिस स्टेशनला दिली असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हे दाखल करुन प्रकरण पोलिसांनी तपासात घेतले आहे. पोहरादेवी येथील आईबाबा नगर वार्ड क ्र.३ मधील रहिवासी उत्तम परांडे मजूरीसाठी कामाला गेले असतांना दिवसा अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी पेटीत असलेले ५00 रुपयाचे २0 नोटा व ३ हजार २00 रुपयाचे चांदीच्या जुन्या पटया असा एकुण २३ हजार २00 रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला असे फिर्यादी उत्तम परांडे यांनी मानोरा पोलिस स्टेशनला दिल्याने अज्ञात चोरटयाविरुध्द कलम ४५४, ३८0, भादंवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Burglary at Pohardevi