मुंगळ्यात घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:30+5:302021-09-11T04:42:30+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, ९ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आंतमध्ये प्रवेश केला व सात ...

मुंगळ्यात घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास
याबाबत अधिक माहिती अशी की, ९ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आंतमध्ये प्रवेश केला व सात ते आठ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख २० हजार रुपये घेऊन पोबारा केला, अशी तक्रार अमोल पवार यांनी पोलिसांत दाखल केली. त्याच रात्री डिगांबर बोबडे यांच्या घरातही चोरी झाली. दरवाज्याची कडी तोडून चोरटे आतमध्ये शिरले व रोख ८ हजार २५६० रुपये लंपास केले. बोबडे यांनीही घटनेची रितसर फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविली.
मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्यासह जमादार गायकवाड, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष महादेव राऊत आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर घटनास्थळी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. त्याने मेडशी ते डोंगरकिन्ही रस्त्याचे लोकेशन दाखविले; मात्र श्वान पथक त्याच्या पुढे गेले नाही. घटनेचा पुढील तपास मालेगाव स्टेशनचे उपनिरीक्षक महल्ले करीत आहेत.