कारंजा येथे घरफोडी

By Admin | Updated: October 29, 2014 01:24 IST2014-10-29T01:24:26+5:302014-10-29T01:24:26+5:30

४0 हजार रुपयांचा ऐवज लंपास.

Burglar at Karanja | कारंजा येथे घरफोडी

कारंजा येथे घरफोडी

कारंजा लाड (वाशिम): येथील गायत्री नगरात राहणारे शशिकांत ठाकूर यांच्या घराचे मागचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ४0 हजार रुपयांचा ऐवज लंपास के ल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दूरसंचार विभागात कार्यरत असलेले शशिकांत ठाकूर यांचे स्थानिक गायत्री नगर परिसरात स्वत:च्या मालकीचे घर आहे. शशिकांत ठाकूर आपल्या परिवारासह दिवाळिनिमित्त नागपूर येथे गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून संधीचा फायदा घेत ब्लू-चिप कॉन्व्हेंट परिसराकडे असलेल्या त्यांच्या घराच्या मागील दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ४0 हजारांचा ऐवज लंपास केला. शशिकांत ठाकूर यांचे बंधू शेजारीच राहतात. त्यांनी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी शशिकांत ठाकूर यांचे घर उघडले असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती शशिकांत ठाकूर यांना फोनवर दिली आणि कारंजा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी कारंजा पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Burglar at Karanja