एकबुर्जी प्रकल्पाच्या भिंतीला झुडपांचा विळखा
By Admin | Updated: August 19, 2014 23:33 IST2014-08-19T23:33:11+5:302014-08-19T23:33:11+5:30
लघुसिंचन विभागाचे कमालीचे दुर्लक्ष : निवासस्थानाची सोय असलेले अधिकारी कर्मचारी असतात तरी कुठे

एकबुर्जी प्रकल्पाच्या भिंतीला झुडपांचा विळखा
वाशिम : शहराला पाणीपुरवठय़ाची जबाबदारी गेल्या ४0 वर्षांपासून सर्मथपने पेलणार्या एकबुर्जी प्रकल्पाच्या भिंतीवर झाडा, झूडपांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. झाडांची ही वाढती संख्या प्रकल्पाच्या भिंतीसाठी धोकादायक नाही का असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे. ६0 वर्षापूर्वी केकतउमरा शिवारात चंद्रभागा या उपनदीला अडवून एकबुर्जी प्रकल्पाची निर्मीती करण्यात आली होती. निर्मीतीवेळी त्या भागातील सिंचनाची सोय होण्यासाठी या मध्यम प्रकल्पाची निर्मीती करण्यात आली होती. निर्मीतीनंतर २0 वर्षाने एकबुर्जी प्रकल्पापासून ६ किलोमिटर अंतरावर असलेल्या वाशिम या शहराला पाणिपुरवठा करण्याचीही जबाबदारी याच मध्यम प्रकल्पावर सोपविण्यात आली. गेल्या ४0 वर्षापासून हा एकबुर्जी प्रकल्प वाशिमकरांची तहाण भागविण्याची जबाबदारी आपल्यातील जलसाठय़ाच्या भरवश्यावर सांभाळत आले. गतवर्षी याच प्रकल्पावरुन वाशिम शहराला वाढिव पाणीपुरवठाही सुरु करण्यात आला. केकतउमरा शिवारातील हजारो हेक्टर जमीन हिरवीगार करण्यासह वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी प्रकल्पाच्या भिंतीची देखभाल करण्यात लघुसिंचन विभागाचे मात्र कमालीचे दूर्लक्ष होतांना दिसत आहे. धरणाच्या भिंतिवर पिचिंगला लागून झाडा,झुडपांनी प्रचंड गर्दी केली आहेच. परंतू भिंतीच्या मध्यभागावर रस्त्याच्या दूतर्फा लागवड केल्यागत काटेरी झाडांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या काटेरी झाडांमुळे भिंतीवर वारुळांची सख्यांही वाढत चालली असून पिचींगच्या वरच्या भागाप्रमाणेच भिंतीच्या पाठिमागचा भागही काटेरी झाडांनी प्रचंड प्रमाणात व्यापला आहे. या दाड झाडीचा प्रकल्पाच्या भिंतीला भविष्यात काही धोका नाही का, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. लघुसिंचन विभाग मात्र यासंबंधी कमाली बेपर्वा दिसत आहे. एकीकडे एकबुर्जी प्रकल्पात यावर्षी अत्यल्प पावसामुळे आजमितीला केवळ २ फुट जलसाठी शिल्लक असल्याची माहिती आहे. या प्रकल्पाची जलसाठा क्षमता जवळपास २८ फूट असून येत्या काही दिवसात पावसाने कृपा न केल्यास एकबुर्जी प्रकल्प मृत जलसाठय़ाची पातळी गाठणार यात शंका नाही.