काजळेश्वर येथे घरोघरी बैलाची पुजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:12+5:302021-09-08T04:50:12+5:30
काजळेश्वर येथे कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढू नये करिता शासनाचे आदेशाचे पालन करीत शेतकरी राजाचा महत्वाचा सण बैलपोळा घरोघरी साधेपणाने ...

काजळेश्वर येथे घरोघरी बैलाची पुजा
काजळेश्वर येथे कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढू नये करिता शासनाचे आदेशाचे पालन करीत शेतकरी राजाचा महत्वाचा सण बैलपोळा घरोघरी साधेपणाने आनंदात व शांततेत सोमवारला उत्साहात साजरा करण्यात आला. पोळा सणानिमित्त रविवारी बैलाची खांदमळनी करण्यात आली, तर सोमवारी बैलाची स्वच्छ अंघोळ घालण्यात आली. बैलांना सजविले. पुरणपोळीच नैवेद्य बैलांना भरवून पूजा व आरती घरोघरी करीत बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बैल हा शेतकऱ्याचा सखा असून, पोशिंदा असल्याने त्याचे स्थान शेतकऱ्याचे जीवनात घरच्या व्यक्तीसमान असल्याचे मत येथील शेतकरी दिगांबर उपाध्ये यांनी व्यक्त केले. मानाच्या बैलाची पूजा मानकरी तुळशीराम उपाध्ये यांनी सहपरिवार घरासमोर केली .आरती नंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला . शांततेत बैल पोळा शासन आदेशाचे पालन करीत पार पडल्याने विठ्ठल संस्थानचे अध्यक्ष अंबादास पा .उपाध्ये यांनी गावकऱ्यांतर्फे आनंद व्यक्त केला .कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदर यांनी गावाला भेट देऊन समाधान व्यक्त केले.