विहिरीत पडलेल्या वळूचे प्राण बचावले!

By Admin | Updated: June 28, 2017 18:51 IST2017-06-28T18:47:48+5:302017-06-28T18:51:19+5:30

कारंजा लाड - विळेगाव शिवारात दोन वळूंची भीषण टक्कर झाली. यादरम्यान दोन्ही वळू ५० फुट खोल असलेल्या विहिरीत पडले.

Bull survivors survived the well! | विहिरीत पडलेल्या वळूचे प्राण बचावले!

विहिरीत पडलेल्या वळूचे प्राण बचावले!

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड - तालुक्यातील ग्राम विळेगाव शिवारात शेतकरी बंडू सावरकर यांच्या शेतात विळेगाव आणि नजिक असलेल्या जामठी येथील दोन वळूंची भीषण टक्कर झाली. यादरम्यान दोन्ही वळू ५० फुट खोल असलेल्या विहिरीत पडले. त्यांना वाचविण्यासाठी सर्वधर्म आपत्कालिन संस्था आणि महसूल प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दोन्ही वळूला विहिरीतून बाहेर काढण्यात आले; परंतू त्यातील एकाचा मृत्यू झाला. प्राप्त माहीतीनुसार, टक्कर खेळता -खेळता शेतातील ५० फूट खोल विहिरीत दोन्हीही वळू पडले. ही माहिती मिळताच गावातील रोशन पवार आणि संजय चव्हान यांनी सर्वधर्म आपत्कालिन संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई, तहसिलदार सचिन पाटील यांना माहिती दिली. तहसिलदार पाटील यांनी पुढाकार घेत गजानन नाखले यांच्या क्रेन मशीनच्या सहाय्याने तब्बल दोन तासानंतर दोन्हीही वळूंना बाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र, त्यातील एका वळूचा तासाभराने मृत्यू झाला.

Web Title: Bull survivors survived the well!