ओबीसी आरक्षणसंदर्भात ‘बसपा’चे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST2021-07-14T04:45:51+5:302021-07-14T04:45:51+5:30
अनुसूचित जातिजमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे, ओबीसींना पूर्ववत राजकीय आरक्षण द्यावे आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा ...

ओबीसी आरक्षणसंदर्भात ‘बसपा’चे आंदोलन
अनुसूचित जातिजमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे, ओबीसींना पूर्ववत राजकीय आरक्षण द्यावे आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय द्यावा, शेतमालाला हमीभाव द्यावा, पेट्रोल-डिझेल भाव कमी करण्यात यावेत; सिलिंडर, गोडे तेलाचे भाव कमी करावेत, महागाई थांबवावी. कोरोनामुळे सर्व हवालदिल झाल्यामुळे वीज बिल माफ करण्यात यावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करावे, प्राध्यापकांची भरती, बिंदूनामावली, विषय-विभागनिहाय करावी, आदी मागण्या राज्याचे प्रदेश सचिव अविनाश वानखेडे यांनी केल्या.
००००
आंदोलनात अनेकांचा सहभाग
या आंदोलनामध्ये जिल्हा प्रभारी बबनराव बनसोड, जिल्हा संघटक विनोद अंभोरे, जिल्हा सचिव ॲड. राहुल गवई, सतीश गवई, प्रकाश आठवले, देवेंद्र खडसे, भारत सावळे, देवानंद मोरे, कैलास कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ध्रुवास बाणवणकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.