शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठांतील नोकर भरतीला खीळ !

By admin | Updated: November 9, 2014 23:46 IST

नोकर भरती निवड मंडळ वर्षभरापासून कार्यरत नाही.

राजरत्न सिरसाटअकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील पदे भरण्यासाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळाची स्थापना केली होती; परंतु या मंडळाचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे कृषी संशोधक तसेच कर्मचारी यांच्या भरती प्रक्रियेला जवळपास खीळ बसली असून, त्याचा थेट परिणाम कृषी संशोधनावर होत आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ दापोली अशी राज्याच्या चार विभागांत कृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांद्वारे महत्वाचे कृषी संशोधन केले जाते; तथापि अलिकडच्या दहा वर्षांत या विद्यापीठांमधील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. एकट्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया १९९0पासून रखडलेली असून तेथे अधिष्ठाता, संशोधन संचालक, प्राध्यापक या मुख्य पदांसह पावणेदोन हजार पदे रिक्त आहेत. कृषी विद्यापीठांचे कुलगुरू किंवा माजी कुलगुरू ंचा महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळात समावेश नाही, हे विशेष. कृषी विद्यापीठांची भरती प्रकिया रखडल्याने संशोधनावर परिणाम होत आहे. जुन्याच पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, यावर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे एकमत आहे. याबाबत कृषी विद्यापीठांचे कुलप ती तथा राज्यपालांची भेट घेण्यात आली असून, लवकरच नोकरभरतीबाबत निर्णय होण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी व्यक्त केली. *पूर्वीची भरती प्रक्रिया नोकर भरती मंडळ स्थापन होण्यापूर्वी कनिष्ठ, वरिष्ठ संशोधन सहाय्यक ते सहयोगी प्राध्यापकांची पदे भरण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना होते. नोकर भर ती मंडळाच्या स्थापनेनंतर हे अधिकार काढण्यात आले आहेत.