बाबासाहेब गोपले यांच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:29+5:302021-08-23T04:43:29+5:30

अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे पुरस्कारप्राप्त बायडाबाई कांबळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लहूजी साळवे कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव जोगदंड, ...

Brighten the memories of Babasaheb Gopale | बाबासाहेब गोपले यांच्या आठवणींना उजाळा

बाबासाहेब गोपले यांच्या आठवणींना उजाळा

अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे पुरस्कारप्राप्त बायडाबाई कांबळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लहूजी साळवे कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव जोगदंड, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर बाजड, पाणीपुरवठा सभापती पप्पीबाई कदम, महिपती इंगळे, रवी आढाव, प्रकाश जोगदंड, एम.टी. कांबळे यांची उपस्थिती होती. प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वसंतराव जोगदंड, बबन महाराज कांबळे, मोहन साठे, प्रकाश जोगदंड, संजय अंभोरे, जगदीश ताकतोडे यांनी स्व. बाबासाहेब गोपले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. स्व. गोपले यांनी मातंग समाजाच्या विकासासाठी शासनास अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची निर्मिती करून घेतली. अण्णा भाऊ यांना भारतरत्न मिळावा, यासाठी ते शेवटपर्यंत संघर्ष करीत राहिले, असे वसंतराव जोगदंड यांनी सांगितले.

या वेळी व्याडचे सरपंच मनोज थोरात, भगवान बाजड, संतोष कांबळे, बबनराव इंगळे, प्रकाश थोरात, विनोद बांगर, संतोष लोखंडे, के.डी. मानवतकर, अशोकराव जोगदंड, संतोष लोखंडे, केशव जोगदंड, भानुदास कांबळे, संदीप कांबळे, सोपान कांबळे, राजू गायकवाड, शुभम लोखंडे, अमोल खवळे, बजरंग हिरण, वामन आरसड, संदीप झेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वसुदेव गायकवाड यांनी केले. मानवतकर यांनी आभार मानले.

Web Title: Brighten the memories of Babasaheb Gopale