शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पुल वाहून गेला; शिरपूर - वाशिम मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 12:24 IST

The bridge was swept away by the rain : शिरपूर ते वाशिम मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.

वाशिम : शिरपूर जैन येथून वाशिमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पावसामुळे  वाहून गेल्याने शिरपूर ते वाशिम मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामुळे ब्राह्मणवाडा परिसरातील शेतकरी सुद्धा अडचणीत आले आहेत. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शिरपुर ते वाशिम रस्त्यावरील ब्राह्मणवाडा येथील नाल्यावरील पूलाचा एक भाग वाहून गेला. तेव्हापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. मात्र काही प्रमाणात पुलाचा भाग कायम असल्याने दुचाकी वाहतूक सुरू होती. या धोकादायक पुलावरून शेकडो शासकीय कर्मचारी, व्यापारी, शालेय विद्यार्थी व नागरिक दुचाकीने शिरपूर -वाशिम -शिरपुर असा प्रवास करीत असत. तरी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीकडे  दुर्लक्ष केले. त्यातच मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवार १९ ऑगस्ट रोजी पूलाचा उरलासुरला भागही पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे शिरपूर - वाशीम रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. या पुलाच्या दुरुस्त सह परिसरातील इतरही पूल पावसामुळे खचुन गेले आहेत.या विषयी २२ जुलै रोजी बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला मुठठा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश चांडे यांनी निवेदन दिले होते. मात्र याकडे अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. ब्राह्मणवाडा येथील वाहून गेलेल्या पुलामुळे ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाणेही अवघड झाले आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी परिसरातील नागरिक  आंदोलन करणार असल्याची माहिती निलेश चांडे यांनी दिली आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन