अरुणावती नदीवरील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 01:06 PM2021-06-10T13:06:05+5:302021-06-10T13:06:49+5:30

Bridge swept away : कोंडोली येथील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला.

The bridge over the river Arunavati was swept away in the first flood | अरुणावती नदीवरील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला

अरुणावती नदीवरील पुल पहिल्याच पुरात वाहुन गेला

googlenewsNext

मानोरा : तालुक्यातील श्री क्षेत्र कोंडोली येथे अरुणावती नदिवर काही वर्षा पूर्वी बांधलेला पुल पहिल्याच पावसात आलेल्या पुरात बुधवारी दिनांक ९ रोजि रात्रि ९ वाजता चे सुमारास वाहुन गेला आहे.यामुळे जिल्हा परिषद बंधकाम विभागाचे पितळ उघडे पड़ले आहे.
कोंडोली वरुन मानोरा कडे येणाऱ्या पारवा, मोहगव्हान,आसोला,आनंदवाडी या चार गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच शेतकरी यांना पेरणी करिता शेतात जाण्यास अड़चन निर्माण झाली आहे.सदर पुलाचे काम सुमारे 2000 मधे केले होते,त्यानंतर या कामा ची दुरिस्ति साठी काही निधि मंजूर केला होता,सद्यस्थितित दुरिस्ति चे काम कंट्रातदार करित असल्याची माहिती मिळाली काम करीत.असताना पुला शेजारी खड्डा खोदून त्यात मुरुम भरला होता.मात्र पाण्या च्या प्रवाहात मुरुमा सह पुलाची एक बाजू वाहुन गेली.ज्या यंत्रनेने हे काम केले ते अधिकारी व कंट्रातदार यांचेवर कार्यवाही करावी व सदर पुलाचे काम तात्काळ व दर्जेदार करावे अशी मागणी गावकरी यांच्यात केलि जात आहे.


 पुल वाहुन गेला असे कळताच तहसिलदार शारदा जाधव,गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे,बंधकाम विभागाचे अभियांता मालानी, घाटगे यांनी घटना स्थळी भेट दिली..

Web Title: The bridge over the river Arunavati was swept away in the first flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.