नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:23+5:302021-08-01T04:38:23+5:30
वाशीम : नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरीचे प्रमाण घटले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाकाळातही शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी लाच ...

नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात !
वाशीम : नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरीचे प्रमाण घटले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाकाळातही शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी लाच घेतली.
शासकीय नियमात बसणारे काम करून देण्यासाठी अनेकजण लाचेची मागणी करतात. काम लवकर व्हावे, याकरिता काही जण लाच देतात तर शासकीय कामासाठी लाच कशाला? या विचाराने काही जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवितात. या तक्रारीनुसार सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई केली जाते. नोटाबंदी, संचारबंदी, कोरोनाकाळातही अनेकांनी लाच मागितली.
००००
महसूल, पोलीस विभाग सर्वात पुढे
लाच मागण्यात महसूल, पोलीस विभाग आघाडीवर असल्याचे दिसून येते. अधिका-यांपेक्षा कर्मचा-यांचे प्रमाण अधिक आहे.
महावितरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, समाजकल्याण, लघुसिंचन आदी विभागांतील काही कर्मचा-यांनादेखील लाचप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले.
शासकीय कामासाठी कुणी लाच मागितली, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले.
०००००००००
लाच शंभरपासून एक लाखांपर्यंत
प्रमाणपत्र देण्यासाठी १०० रुपयांची लाच
वाशीम नगर परिषदेंतर्गत तक्रारदारास बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याकरिता १०० रुपयांची लाच एका शिपायाने मागितल्याची घटना २०१९ मध्ये घडली होती.
.............
आरोपी न करण्यासाठी ९० हजारांची लाच
तक्रारदाराकडे मित्राने ठेवलेली दुचाकी चोरीची आहे. त्या प्रकरणात तक्रारदारास आरोपी न करण्याकरिता कारंजा येथील एका पोलीस कर्मचा-याने ९० हजार रुपये लाचेची मागणी २०१८ मध्ये केली होती.
००००००००००००
कोट बॉक्स
कोणत्याही शासकीय, निमशासकीय कामासाठी कुणीही कुणालाही लाच मागू नये तसेच लाच देऊ नये, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वारंवार करण्यात येते. कुणी लाचेची मागणी करीत असेल, तर कोणतीही भीती न बाळगता तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते तसेच भविष्यात तक्रारदाराला आरोपीकडून त्रास होणार नाही, याची दक्षतादेखील घेण्यात येते.
- शंकर शेळके
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशीम