लाचखोर गटविकास अधिकारी एलसीबीच्या जाळय़ात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:57 IST2017-09-26T01:57:43+5:302017-09-26T01:57:51+5:30

वाशिम: मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी  संजय नामदेवराव महागावकर यांनी विहिरीच्या खोदकामाच्या  बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची  लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस निरीक्षक आनंद रूईकर यांच्या पथकाने सोमवार, २५ स प्टेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून दुपारच्या  सुमारास महागावकर यांना अटक केली.

Bribery Group Development Officer LCB burns! | लाचखोर गटविकास अधिकारी एलसीबीच्या जाळय़ात!

लाचखोर गटविकास अधिकारी एलसीबीच्या जाळय़ात!

ठळक मुद्देएक हजार रुपयांची मागितली लाचअकोला येथील उर्दू शिक्षक भरतीप्रकरणी आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी  संजय नामदेवराव महागावकर यांनी विहिरीच्या खोदकामाच्या  बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची  लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस निरीक्षक आनंद रूईकर यांच्या पथकाने सोमवार, २५ स प्टेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून दुपारच्या  सुमारास महागावकर यांना अटक केली.
प्राप्त माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन  योजनेंतर्गत तक्रारदारांच्या वडिलांचे नावे झालेल्या विहिरीच्या  खोदकामाच्या पहिल्या बिलाचा ७१ हजार रुपयांचा धनादेश  खात्यामध्ये जमा करण्यासाठी गटविकास अधिकारी महागावकर  याने २९ ऑगस्ट रोजी एक हजाराची लाच मागितली होती, अशी  तक्रार १३ सप्टेंबर रोजी वाशिम येथील एसीबी कार्यालयात  दिली. या तक्रारीवरून १४ सप्टेंबर रोजी पडताळणी केली अस ता गटविकास अधिकारी महागावकर यांनी पडताळणीदरम्यान १  हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून १८  सप्टेंबर व २२ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला  असता गर्दी वाढल्यामुळे तक्रारदारावर संशय आला त्यामुळे  गटविकास अधिकार्‍याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. 
१४ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकार्‍यांनी तक्रारदार  यांच्याकडून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने  गटविकास अधिकारी महागावकर यांना सोमवारी जिल्हा परिषद  कार्यालयातून ताब्यात घेतले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात स् थायी समितीची सभा सुरू होताच, लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या पथकाने एका शिपायामार्फत महागावकर यांना बाहेर  बोलाविण्यात आले. सभागृहाच्या बाहेर येताच, एसीबीच्या प थकाने महागावकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कलम ७  लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल  केला. 

Web Title: Bribery Group Development Officer LCB burns!