मतांचे विभाजन ठरणार निर्णायक!
By Admin | Updated: October 7, 2014 01:16 IST2014-10-07T01:16:51+5:302014-10-07T01:16:51+5:30
कारंजा विधानसभा मतदारसंघात उमेदवार व पक्षाची अभूतपूर्व गर्दी.

मतांचे विभाजन ठरणार निर्णायक!
कारंजा लाड (वाशिम) : कारंजा विधानसभा मतदारसंघात उमेदवार व पक्षाची अभूतपूर्व गर्दी झालेली आहे. मतांचे प्रचंड विभाजन होणार आहे. सामान्य मतदार भांबावला आहे. लोकशाही प्रणालीत मतदान करताना मतदार सर्वप्रथम सशक्त व सक्षम राजकीय पक्षाची निवड करतात. ही निवड संभ्रमात टाकणारी असेल तर उमेदवारांची तुलना केली जाते. युती व आघाडी तुटल्यामुळे म तदार व कार्यकर्ते यांची पळापळ झाली. सध्यातरी पंचरंगी लढतीत भाजप, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व बसपा आणि तगडे अपक्ष यांच्यात म तदारांची विभागणी होणार आहे. त्यामुळे आजही चित्र अस्पष्टच आहे. या विभागणीचा फायदा कोणाला मिळतो, याबाबत मतदारांमध्ये चर्चा रंगत आहेत.