सापळी येथे वर्षभरापासून निर्जंतुकीकरण फवारणीस ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:14+5:302021-09-08T04:50:14+5:30

सापळी, शेलू खुर्द, उमराळा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक भागांत गटारमध्ये ...

‘Break’ of disinfectant spraying for a year at Trap | सापळी येथे वर्षभरापासून निर्जंतुकीकरण फवारणीस ‘ब्रेक’

सापळी येथे वर्षभरापासून निर्जंतुकीकरण फवारणीस ‘ब्रेक’

सापळी, शेलू खुर्द, उमराळा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक भागांत गटारमध्ये पाणी साचून आहे. काही भागांत नागरिकांनी जमा केलेले शेणखत कित्येक महिन्यांपासून तसेच पडून असल्याने त्यावर विविध कीटकांचा व डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशा अनेक बाबी सापळी येथे संसर्गजन्य आजारांना जणू निमंत्रण देत आहेत.

असे असताना नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याकडे स्थानिक ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. परिणामी, सापळी येथे प्रत्येक भागात सर्दी, खोकला, मलेरिया, डेंग्यू व तापाच्या आजाराने ग्रस्त नागरिकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

................

कोट :

सापळी येथे स्वच्छताविषयक बाबींकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे. यामुळे विविध आजारांना निमंत्रण देणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. ग्रामपंचायतीने डास प्रतिबंधक धूर फवारणी करावी, यासंबंधी ग्रामसचिवास निवेदन दिले. त्याची संबंधितांनी दखल घेणे अपेक्षित आहे.

- गजानन ढगे, नागरिक, सापळी.

Web Title: ‘Break’ of disinfectant spraying for a year at Trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.