शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

मुलं म्हणतात...बाबा मला शाळेला जायचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 12:00 PM

आता ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या पालकांना ‘बाबा मला शाळेला जायचं’म्हणताना दिसून येत आहेत.

- माणिक डेरे लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शाळा बंद असल्याने आॅनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आता ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या पालकांना ‘बाबा मला शाळेला जायचं’म्हणताना दिसून येत आहे. गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी आॅनलाईन शिक्षण घेवू शकत नसल्याने काही शिक्षक विद्यार्थ्यांना आॅफलाईन शिक्षण घरोघरी जावून देत आहेत.शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी गरीब सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांला स्मार्ट फोन घेणे अशा बिकट परिस्थितीत कठीण जात आहे. आॅनलाइन शिक्षण घेता येत नाही ,त्यामुळेच बाबा मला शाळेत जायचं हो! अशी हाक विद्यार्थी आपल्या पालकांना देत आहे. वंचित राहावे लागत आहे.आजही मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील पालक हातावर आणून पानावर जेवण करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे . त्यामुळे अशा कुटुंबातील पाल्याचे काय असा सवाल पालकांना भेडसावत आहे . स्मार्ट फोन आणायचा कोठून? असा प्रश्न पालकांना पडला आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे सद्याच्या परिस्थितीत शैक्षणिक नुकसान होत असल्याची चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. कोरोना विषाणू गाव खेड्यात येऊन पोहचला त्यामुळे संसर्गजन्य प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिक्षणावरील वाढता खर्च मोल मजुरी करणारेी गरीब शेतमजूर , शेतकरी यांना झेपावत नसल्याचे चित्र आहे. शासनाने शाळा सुरू करण्यासाठी अद्याप निर्देश दिले नाही, त्यामुळे सर्वच शाळा बंद आहे. अशा परिस्थितीत शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातील पालक करीत आहे.

मोबाईलअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता शिक्षकांचे आॅफलाईन शिक्षणग्रामीण,गरीब कुटुंबातील मुलां जवळ स्मार्ट फोन नाही,कुणाकडे असेल तर रेंज नाही.अशा स्थितीत मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून काही शाळांचे शिक्षक प्रत्यक्ष मुलांचे घरी जाऊन त्यांना आॅफलाइन शिक्षण देत आहे.पालकांच्यावतिने त्यांचे मनोमन आभार व्यक्त केल्या जात आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी