जुगार खेळणार्या दोघांना अटक
By Admin | Updated: July 12, 2014 02:11 IST2014-07-12T02:08:26+5:302014-07-12T02:11:35+5:30
शिरपूर जैन पोलिसांनी वरली जुगार खेळणार्या दोघांना अटक केली.

जुगार खेळणार्या दोघांना अटक
शिरपूर जैन :स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या केशव नगर येथे वरली जुगार खेळणार्या दोघांना पोलीसांनी अटक केल्याची घटना १0 जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार केशव नगर येथे वरली जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याची माहीती पोलीस उपनिरिक्षक असद पठाण यांना मिळाली. त्यांनी लगेच शिपाई संदीप बरडे यांना सोबतीला घेऊन सदर जुगारावर छापा मारला. यावेळी वामन नारायण जाधव व शिवाजी सुदर्शन अवचार या दोघांना अटक करण्यात आली. दोघांजवळूनही रोकड व ईतर साहीत्य जप्त आली आहे.