‘त्या’ युवकाचा तिसर्या दिवशी आढळला मृतदेह
By Admin | Updated: May 3, 2015 02:17 IST2015-05-03T02:17:16+5:302015-05-03T02:17:16+5:30
देवठाणा खांब येथील घटना; पोहण्यासाठी गेला होता युवक.

‘त्या’ युवकाचा तिसर्या दिवशी आढळला मृतदेह
मालेगाव: तालुक्यातील देवठाणा खांब येथील धरणावर ६ ते ७ मित्र पोहण्यासाठी गेले असता त्यांच्यातील एक जण पाण्यात बुडाल्याची घटना ३0 एप्रिलला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली होती. त्याचा शोध घेणे सुरू असताना ग्रामस्थांना व पोलिसांना अपयश आले. घटनेच्या तिसर्या दिवशी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मालेगाव तालुक्यातील देवठाणा खांब येथे असलेल्या धरणावर गावातील ६ ते ७ मित्र ३0 एप्रिल रोजी पोहण्यासाठी गेले हो ते. पाण्यात पोहता-पोहता २३ वर्षीय युवक शरद ङ्म्रीराम पवार दिसला नसल्याने सोबत असलेल्या मित्रांनी शोध घेतला अस ता दिसून न आल्याने ही बाब गावकर्यांना सांगितली. गावकर्यांनीही शोध घेतला असता युवक न मिळाल्याने सदर बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी १ मे रोजी गावकर्यांच्या सहकार्याने दिवसभर तपास केला असता त्यांनाही अपयश आले. आज २ मे रोजी सकाळी ७ वाजता आपत्ती व्यवस्थापन चमूला पाचारण करण्यात आले होते. सर्व जण तपासासाठी आले असता शोध कार्य सुरू करण्यापूर्वीच शरदचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या प्रकरणाची फिर्याद संजय आ त्माराम पवार यांनी पोलिसांत दिल्यावरून र्मग १२/१५ कलम १७४ नुसार नोंद करण्यात आली.