तीन दिवसांपूर्वी बुडालेल्या युवकाचा मृतदेह काढला!

By Admin | Updated: January 12, 2016 02:02 IST2016-01-12T02:02:14+5:302016-01-12T02:02:14+5:30

वाघोला नदीमध्ये बुडाला होता युवक.

The body of a young man drowned three days ago! | तीन दिवसांपूर्वी बुडालेल्या युवकाचा मृतदेह काढला!

तीन दिवसांपूर्वी बुडालेल्या युवकाचा मृतदेह काढला!

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मुसलवाडी येथील एका युवकाचा मृतदेह संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक अकोलाच्या तरुणांनी सोमवारी वाघोली येथील नदीमधून बाहेर काढला. मुसलवाडी येथील तरुण संदीप ठाकरे हा ९ जानेवारी रोजी वाघोली येथील पैनगंगा नदीमध्ये बुडाल्याची माहिती मिळाली. तरुणाचा शोध गत तीन दिवसांपासून सुरू होता. नदीमध्ये खोल डोह असल्याने शोध घेणे कठीण झाले होते. सोमवारी ११ वाजता संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरच्या जवानांनी शोध कार्य चालू केले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पथकाच्या जवानांनी मृतदेह शोधून काढला.

Web Title: The body of a young man drowned three days ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.