बोअरवेल मशीनवरून पडून इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: September 15, 2016 02:56 IST2016-09-15T02:56:03+5:302016-09-15T02:56:03+5:30
मानोरा तालुक्यातील भुली येथील घटना.

बोअरवेल मशीनवरून पडून इसमाचा मृत्यू
मानोरा(जि. वाशिम), दि. १४ : तालुक्यातील भुली येथील घरगुती बोअरवेल करीत असताना मशीनवरून खाली पडून मुरगेसन करप्पन (५५) यांचा १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला. तामिळनाडू राज्यातील बोअरवेल मशीन तालुक्यात बोअर खोदण्याचे काम करते. भुली येथे बोअरवेल करण्यासाठी गेले असता बोरअवेल मशीनच्या रॉडमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या मुरगेसन करप्पन रा.मलगिरे ता.आतुर जि.झेलम (तामिळनाडू) हे वर गेले असता तोल जाऊन खाली डोक्यावर पडले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.