इमर्जन्सी ब्लड डोनेट ग्रुपचे श्रीकांत इंगोले ,अमोल अंबलकर, राहुल साळुंके, सागर गुल्हाने, सचिन अंबलकर, ओंकार जोशी, भूषण पाटील, सावन कांबळे, लक्ष्मन फरास या युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात मीनल अंबलकर, राजश्री गुल्हाने, कल्याणी पेंढारकर, अपर्णा ठाकरे, सुरेखा बाहेती, ज्योती बजाज या महिलांसह सय्यद वसीम, युवराज टोपले, संदेश मुळे, अमोल सावळे, रोशन वानखडे मिळून एकूण ४० लोकांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी जय गजानन क्रीडा मंडळ, टायगर ग्रुप, वाशिम जिल्हा मित्र परिवार, राजस्थानी महिला मंडळ, विद्यार्थी पदवीधर संघटना, मंगलधाम मित्र मंडळ यांचे यासाठी सहकार्य मिळाले.
मंगरुळपीर येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:44 IST