शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

‘ब्लड कॅन्सर’ग्रस्त हरीदासला हवी दात्यांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 15:32 IST

हरीदासच्या वृद्ध मातापित्यांनी पोट उपाशी ठेवत हरीदासने जमलविलेल्या तुटपुंज्या रकमेत त्याच्यावर उपचार सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : रातालुक्यातील यशवंतनगर येथील हरीदास उकंडराव शेलकर या ३१ वर्षीय विवाहित शेतमजुर तरूणास ‘ब्लड कॅन्सर’चा दूर्धर आजार जडला आहे. मजुरीच्या भरवशावर पोट भरणाऱ्या हरीदासकडे उपचारासाठी पैसे नसल्याने त्याचे चिमुकले उघड्यावर येऊ नयेत म्हणून त्याचे वृद्ध आईवडिल उपचाराच्या खर्चासाठी दात्यांना मदतीचे आवाहन करीत आहेत.यशवंत नगर येथील रहिवासी उकंडराव शेलकर यांना हरीदास नावाचा एक मुलगा आहे. जेमतेम १० वा वर्ग उत्तीर्ण झालेला हरीदास शेतमजुरी करून आपल्या कुटूंबाचे उदरभरण करतो. विवाहित हरीदासवर वृद्ध मातापित्यांसह पत्नी, एक मुलगा आणि एका मुलीची जबाबदारी आहे. शेतमजुरी करून समाधानाने आपल्यासह मातापिता, पत्नी आणि दोन मुलांचा सांभाळ करीत असतानाच हरीदास आजारी पडला. त्याला सतत ताप येऊ लागली. आजार बरा होण्याची चिन्हे दिसत नसल्याने हरीदासने कारंजा येथे एका खासगी दवाखान्यात तपासणी केली. त्यावेळी रक्तात पांढºया पेशींची संख्या वाढल्याचे निदान डॉक्टरांनी केले आणि नागपूर येथे जाण्याचा सल्लादिला. त्यावरून नागपूरच्या जामठा येथे एका खासगी दवाखान्यात तपासणी केली असता हरीदासला ‘ब्लड कॅन्सर’ झाल्याचे कळले. त्यामुळे हरीदासच्या वृद्ध मातापित्यांनी पोट उपाशी ठेवत हरीदासने जमलविलेल्या तुटपुंज्या रकमेत त्याच्यावर उपचार सुरू केले. आजवर त्यासाठी २ लाख ५० हजार रुपये खर्च त्यांना आला. आता त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसून, हरीदासच्या भरवशावरच त्याचे दोन चिमुकले, पत्नी आणि मातापित्यांची भीस्त आहे. आजारामुळे अघटीत घडून हरीदासचे चिमुकले उघड्यावर पडू नयेत म्हणून त्याचे मातापिता उपचारासाठी समाजातील दात्यांना मदतीचे आवाहन करीत आहेत.

 

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिम