नगर परिषदेमध्ये सभापतीं निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:52+5:302021-01-17T04:35:52+5:30

वाशिम नगरपालिकेच्या विषय समित्यांसाठी नगर पालिका सभागृहात आज निवडणूक झाली. सदर निवडणुकीत गटनेत्या रेखा शर्मा व उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ठाकूर ...

BJP's supremacy in the election of the Speaker in the Municipal Council | नगर परिषदेमध्ये सभापतीं निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा

नगर परिषदेमध्ये सभापतीं निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा

वाशिम नगरपालिकेच्या विषय समित्यांसाठी नगर पालिका सभागृहात आज निवडणूक झाली. सदर निवडणुकीत गटनेत्या रेखा शर्मा व उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ठाकूर यांच्या पुढाकाराने भाजपाने आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. यामध्ये सत्ताधारी शिवसेनेला क्लीन स्वीप देत ५ पैकी ४ समित्यांचे सभापतिपद आपल्याकडे खेचण्यात भाजपाला यश मिळाले. एका समितीच्या सभापतिपदावर भारिप बहुजन महासंघाला विजय मिळविता आला. बांधकाम समितीच्या सभापतिपदी भाजपाचे नगरसेवक गौतम सोनोने, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी नगरसेवक प्रभाकर काळे, शिक्षण समिती आशा खटके, नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी चंदा जीवनानी यांची वर्णी लागली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी भारिप बमंसच्या हिना कौसर यांची निवड झाली. तसेच स्थायी समितीमध्ये नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापतींसह भाजपाचे रूपेश वाघमारे , गौतम भालेराव यांची तर काँग्रेसच्या नगरसेविका कुसुमताई गोरे यांची निवड झाली.

Web Title: BJP's supremacy in the election of the Speaker in the Municipal Council