गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:24+5:302021-03-22T04:37:24+5:30
वाशिम : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉंबमध्ये आरोप करण्यात आलेल्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ ...

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा एल्गार
वाशिम : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉंबमध्ये आरोप करण्यात आलेल्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने २१ मार्च राेजी एल्गार पुकारला. स्थानिक पाटणी चौकात निदर्शने व सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटकांची स्कार्पिओ, गाडीमालक हिरेन यांचा संशयास्प्द मृत्यू आदी प्रकरणांनी सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची याच प्रकरणात उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंगांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्र देऊन त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. देशमुखांनी प्रतिमाह १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे पत्रात नमूद केले. महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने पाटणी चौकात निदर्शने केली. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी आमदार लखन मलिक, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे, शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय काळे, गणेश खंडाळकर, सुनील तापडिया, नीतेश मलिक, अंबादास कालापाड, डिगांबर खोरणे, रामभाऊ देव, रामेश्वर ठेंगडे, कपिल सारडा, विश्वास ब्रह्मेकर, गजानन पाटोळे, कैलास मुंगणकर, जगदीश देशमुख, प्रभाकर पदमणे, भीमकुमार जिवनानी, रूपाली देशमुख, अंजली पाठक, आशुतोष निरखी, राजू कलवार, गोलू काळे, शुभम आढाव, सुरेश गिरमकर, जिग्नेश लोढाया आदींची उपस्थिती होती.