राजेंद्रजी पाटणी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून कार्यक्रमाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST2021-06-19T04:27:22+5:302021-06-19T04:27:22+5:30

तालुका भाजपाकडून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार करण्यात येणार असून, साडी चोळीची भेट देण्यात येणार आहे. तालुक्यातील ...

BJP organizes a program on the occasion of Rajendraji Patni's birthday | राजेंद्रजी पाटणी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून कार्यक्रमाचे आयोजन

राजेंद्रजी पाटणी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून कार्यक्रमाचे आयोजन

तालुका भाजपाकडून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार करण्यात येणार असून, साडी चोळीची भेट देण्यात येणार आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र यात कार्यरत असणाऱ्या अंदाजे १५८ आशा सेविकांचा सत्कार शनिवारी करण्यात येणार आहे. सर्व आशा सेविकांना कार्यक्रम स्थळांची माहिती आरोग्य केंद्रात, प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली असून भाजपा पदाधिकारी वेळेत पोहचून आशा सेविकांचा सत्कार करणार आहे. भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे यांनी सांगितले की, आशा सेविकांनी कोरोना काळात केलेले कार्य अभिमानास्पद आहे. संक्रमण काळात आशा सेविकांची सेवा कौतुकास्पद, उल्लेखनीय आहे. आरोग्य क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कार्याची परतफेड होऊ शकत नाही. निस्पृह सेवेची आठवण म्हणून या आरोग्य सेवेत कार्यरत आशा सेविकांनी भेट स्वीकारावी, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे यांनी केले आहे, असे तालुका प्रसिध्दी प्रमुख संजय भेंडे यांनी कळविले आहे.

Web Title: BJP organizes a program on the occasion of Rajendraji Patni's birthday