भाजप सरकारने शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:41 IST2021-01-23T04:41:35+5:302021-01-23T04:41:35+5:30

ते रिसोड येथील एका लॉनमध्ये आयाेजित सत्कार समारंभात बोलत होते. संजय राठोड यांच्या वाशिम जिल्हा दौऱ्यात माजी जिल्हा ...

The BJP government betrayed the farmers | भाजप सरकारने शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला

भाजप सरकारने शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला

ते रिसोड येथील एका लॉनमध्ये आयाेजित सत्कार समारंभात बोलत होते. संजय राठोड यांच्या वाशिम जिल्हा दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सभापती विश्वनाथ सानप यांनी रिसोड तालुक्यातील सवड, चिंचाबाभर, एकलासपूर, मोप, शेलु खडसे, वनोजा, कंकरवाडी, लोणी, मोठेगाव, मांडवा, मोहजाबंदी, जवळा यासह गावातील नवनिर्वाचित निवडक प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले हाेते. या वेळी माजी जिल्हा परिषद सभापती विश्वनाथ सानप, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक अंभोरे, नगरसेवक नितीन मडके, नारायणराव सानप, राजा भैया, महादेव सानप, झाकीरभाई, महादेव चाटे, आसाराम चव्हाण आदी मंचावर उपस्थित होते. मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक अर्जुन वरघट व माजी सभापती सानप यांनी संजय राठोड यांना त्यांच्या कार्याचा गौरव करणारी शब्दरूपी कवितेची प्रतिमा भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन वरघट यांनी केले. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The BJP government betrayed the farmers