भरदिवसा दोन चो-या
By Admin | Updated: June 22, 2016 00:34 IST2016-06-22T00:34:33+5:302016-06-22T00:34:33+5:30
रिसोड येथे भरदिवसा दोन चो-या झाल्यात.

भरदिवसा दोन चो-या
रिसोड (जि. वाशिम): रिसोड शहरात भरदिवसा २१ जून रोजी दोन ठिकाणी चोर्या झाल्याची घटना घडली. रिसोड येथे ङ्म्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळयातील २५ ग्रॅम वजनाची ७0 हजार किंमत असलेला सोन्याचा गोफ दुचाकीच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. इंदिराबाई बोंडे रा.व्याड या ६0 वर्षीय महिलेच्या तक्रारीहून रिसोड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय विजय रत्नपारखी करीत आहेत. दुसर्या घटनेत भरदिवसा महिलेस मारहाण करुन २ मोबाईल व रोख ४५0 रुपये अज्ञात चोरट्यांनी पिंगलाक्षी देवी मंदिर परिसरातून लंपास केले. रुमाना सलीम सयद रा. सर्मथ नगर हीने तक्रार नोंदविली की ती मैत्रिण सोबत पिंगलाक्षी देवीचे मंदिर दाखविण्यासाठी गेली असता, एका अज्ञात इसमाने मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास केली.