ठिकठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST2021-01-13T05:46:18+5:302021-01-13T05:46:18+5:30

मंगरूळपिर : शहापूर येथील अंगणवाडी १ ते ३ मध्ये १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी ...

Birthday celebrations of Rajmata Jijau and Swami Vivekananda at various places | ठिकठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव साजरा

ठिकठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव साजरा

मंगरूळपिर : शहापूर येथील अंगणवाडी १ ते ३ मध्ये १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला

यावेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले . हा कार्यक्रम प्रकल्प अधिकारी नितीन लुंगे व सुरेखा बोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला . यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशिकला हिवाळे, अंगणवाडी सेविका सुनंदा सोनोने, सुनीता देवळे, सिंधू तवर, वनिता विटकरे, छाया क्षीरसागर, निर्मला गवारगुरु , राजगुरे आदी उपस्थित होते . यावेळी शशिकला हिवाळे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जीवनावर आधारित भाषण केले . तसेच यावेळी चिमुकल्यांनी राजमाता जिजाऊंची वेषभूषा परिधान करून लक्ष वेधले होते . यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम सादर करण्यात आले . या कार्यक्रमाचे संचलन सिंधू तवर तर आभार सुनीता देवळे यांनी मानले . या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

———————-

श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालय

वाशिम : येथील श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालयात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुणराव सरनाईक तसेच शाळेचे मुख्याध्यापक वीरेंद्र वाटाणे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. शिक्षक पडघान यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. शाळेचे मुख्याध्यापक वीरेंद्र वाटाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . अरुणराव सरनाईक यांनी आपल्या भाषणामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन कीर्ती सातव यांनी केले.

———————-

ध्यास कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

मंगरुळपीर : येथील ध्यास कार्यालयात १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

ध्यास संपर्क प्रमुख व लेकी बाळी क्रांतीबंड युवती आघाडी वाशिम जिल्हा समन्वयक अश्विनीताई औताडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला क्षेत्रीय समन्वयक देवानंद राऊत, राजेश दबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. यावेळी राऊत यांनी महिलांना विविध व्यवसायाचे मार्गदर्शन केले , तसेच महिलांना आत्मनिर्भर होऊन स्वतः चे संरक्षण करावे असे सांगितले. औताडे यांनी मुलींसाठी कराटे प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार असून ज्यांना प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी ध्यास कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला शारदा पातळे, चंद्रकला ठाकरे, रुपाली जाधव, गंगा ठाकरे, किरण पाणभरे, रुख्मिना लांभाडे, वैशाली लांभाडे, नीता वैद्य, शांता लांभाडे, रंजना ठाकरे, जयश्री लांभाडे आदींची उपस्थिती होती.

..................

धावंडा येथे माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा

मानोरा : तालुक्यातील धावंडा येथे शिवसेना पदाधिकारी इंदल (भोला) राठोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव १२ जानेवारीला साजरा करण्यात आला.

जिजाऊ यांनी प्रत्येक मावळ्यामध्ये शिवबा घडविला, स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकावर शिवबांप्रमाणेच प्रेम केले, माँसाहेब जिजाऊ साहेबांनी आपल्या शिवबांसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची धगधगती मशाल क्रूर परकीय आक्रमकांना जाळून खाक करण्यास शिवबांना कामी आल्याचे प्रतिपादन जिजामाता यांच्या जन्मोत्सवानिमित्त अभिवादन कार्यक्रमात भोला राठोड यांनी केले. यावेळी गावकरी, शिवसैनिक उपस्थित होते.

....................

Web Title: Birthday celebrations of Rajmata Jijau and Swami Vivekananda at various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.