शिरपूर परिसरात कांदा बिजवाईचे सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST2021-03-23T04:43:35+5:302021-03-23T04:43:35+5:30

शिरपूर, तिवळी, घाटा, मिर्झापूर, किन्ही घोडमोड, दुधाळा, पांगरखेडा परिसरात फळबाग, बिजवाई कांदा उत्पादक शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. ...

The biggest loss of onion sowing in Shirpur area | शिरपूर परिसरात कांदा बिजवाईचे सर्वाधिक नुकसान

शिरपूर परिसरात कांदा बिजवाईचे सर्वाधिक नुकसान

शिरपूर, तिवळी, घाटा, मिर्झापूर, किन्ही घोडमोड, दुधाळा, पांगरखेडा परिसरात फळबाग, बिजवाई कांदा उत्पादक शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. मोठा खर्च लावून बिजवाई कांदा पीक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठे केले. अवघ्या काही दिवसांतच हे पीक काढणीला येणार होते. बिजवाई कांदा पीकही अतिउत्तम होते. मात्र १९ मार्च रोजी रात्री ८ वाजता गारपीट होऊन वादळी पाऊस पडला. यामध्ये हातातोंडाशी आलेले बिजवाई कांदा पिक उद्ध्ववस्त झाले. संजय देशमुख, गजानन देशमुख या भावंडाच्या आठ एकरामधील, पंकज देशमुख तीन एकर, अमोल देशमुख चार एकर, अनिल देशमुख दोन एकर, विनायकराव देशमुख यांचा दोन एकरांतील असे विविध प्रकारांतील शेकडो शेतकर्‍यांचे कांदा बीजवाई पिकाचे नुकसान झाले. याचप्रमाणे खरबूज कलिंगड उत्पादक शेतकरी गणेश इरतकर, दिलीपराव देशमुख, सचिन निकम, भाजीपाला उत्पादक संतोष वाघमारे व इतर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कैलासराव देशमुख यांच्या आठ एकरांतील केळीचे, तर विठ्ठल काळे यांच्या शेतातील आंबा व चिकू बागेचे मोठे नुकसान तर गावंडे यांच्या शेतातील लिंबू बागेची ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरपूर येथील तलाठी एन. व्ही. अंबुलकर, जे. एन. साठे, पी. एस. अंभोरे हे तहसीलदार रवी काळे यांच्या आदेशावरून नुकसानीचे पंचनामे करून सर्वेक्षण करीत आहे. गारपीट व वादळी पावसाने विशेषतः कांदा बीज उत्पादक व फळबाग असलेल्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. इतर शेतकऱ्यांचेही गहू, मका, ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले.

Web Title: The biggest loss of onion sowing in Shirpur area