पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांना ‘भूमिपुत्र’चा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:36+5:302021-08-01T04:37:36+5:30

पावसाळ्यातील आजार जनावरांवर येत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांत जाऊन तेथील पशूंची काळजी घेणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकांनी काम बंद केले ...

Bhumiputra's support for the demands of livestock supervisors | पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांना ‘भूमिपुत्र’चा पाठिंबा

पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांना ‘भूमिपुत्र’चा पाठिंबा

पावसाळ्यातील आजार जनावरांवर येत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांत जाऊन तेथील पशूंची काळजी घेणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकांनी काम बंद केले आहे. या सर्व खाजगी व शासकीय पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी जोपर्यंत आंदोलन चालेल तो भूमिपुत्राचा पाठिंबा राहील, याची ग्वाही संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देव इंगोले यांनी केले, तर कार्यक्रमासाठी डॉ. भागवतराव महाले, भूमिपुत्र जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, खाजगी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चव्हाण, डॉ. विष्णू पोपळघट, डाॅ. अमर दहीहांडे, अमोल भारती, बालाजी कोकाटे, भागवत शिंदे, माधव कोघे, गजानन धोंडे, विनोद भेडेकर, नंदकिशोर सावदे, शशिकांत पवार, संजय मनवर, संतोष वाढे, पांडुरंग तायडे, नंदकिशोर केळे, पांडुरंग खंदारे, अभिजित घुगे, धन॓ंजय आंधळे, दीपक देव्हढे, ज्ञानेश्वर डाखोरे, पंकज, तुरक यांच्यासह जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षक संघटनेचे पदाधिकारी तथा भूमिपुत्रचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Web Title: Bhumiputra's support for the demands of livestock supervisors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.