नागरिकांची तहान भागविण्यासाठी ‘त्यांनी’ स्वखर्चातून घेतली बोअरवेल !
By Admin | Updated: April 18, 2017 13:14 IST2017-04-18T13:14:02+5:302017-04-18T13:14:02+5:30
कामरगाव येथील आठवडी बाजारात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नागरिकांची तहान भागविण्यासाठी ‘त्यांनी’ स्वखर्चातून घेतली बोअरवेल !
कामरगाव (वाशिम) : येथील आठवडी बाजारात असलेली पाणी समस्या लक्षात घेता प्रा. रामेश्वर काकाणी व सरला काकाणी यांनी ९० हजार रुपये खर्चून बोअरवेल घेतली. आता या बोअरवेलचे पाणी नागरिकांना मोफत दिले जात आहे.
अमरावती येथे वास्तव्यास असलेले व पेशाने शिक्षक असलेले प्रा.रामेश्वर काकाणी व सरला काकाणी यांनी कामरगाव येथील आठवडी बाजारात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्वत: ९० हजार रुपयांची झळ सोसून या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली. या सुविधेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा रणजित देशमुख, जि.प.सदस्य मिना भोने, प्रा.रामेश्वर काकाणी, सरला काकाणी, राजु सिखची, सरिता सिखची, राजेश साबु, डॉ.नरेंद्र काकाणी, कल्पना काकाणी, रितेश जैन, राजु राठी, रमेशलाल काकाणी, जमनलाल काकाणी आदींची उपस्थिती होती.