शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भारिप-बमसंचे ‘आॅपरेशन क्लीन’; निष्क्रिय पदाधिका-यांना दाखविला घरचा रस्ता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:24 PM

कारंजा लाड : पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून भारिप-बमसंने ‘आॅपरेशन क्लिन’ हाती घेतले असून, पक्षाच्या निष्क्रीय पदाधिका-यांना घरचा रस्ता दाखविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समिक्षा बैठकीत घेण्यात आला. 

ठळक मुद्देपक्ष संघटनेत फेरबदलाचे जिल्हाध्यक्षांचे संकेत समिक्षा बैठकीत चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून भारिप-बमसंने ‘आॅपरेशन क्लिन’ हाती घेतले असून, पक्षाच्या निष्क्रीय पदाधिका-यांना घरचा रस्ता दाखविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समिक्षा बैठकीत घेण्यात आला.  कारंजा येथील पुंजानी कॉम्प्लेक्स येथील उपजिल्हा कार्यालयात २८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या समिक्षा बैठकीत विविधांगी बाजूने चर्चा करण्यात आली. भारिप बहुजन महासंघामध्ये निष्क्रियपणे काम करणाºया वाशिम जिल्ह्यातील कार्यकारणीतील पदाधिकाºयांचे लवकरच खांदेपालट  करण्याचे सूचक विधान जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी यावेळी केले. पक्षाचे लेटरहेड केवळ नावापुरते ठेवू नका. ज्यांना पक्ष संघटनेचे काम करायला वेळ नाही, त्यांची आता गय केली जाणार नसल्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला.फुले, शाहू, आंबेडकर यांच्या स्वप्नातील समानतेवर आधारित समाज निर्माण करणे म्हणजेच भारिपचे सोशल इंजिनिअरिंग आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पदाधिकाºयांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग सुरूवातीला पक्ष संघटनेत केला आणि त्यानंतर हाच प्रयोग करून नगर परिषद, ग्राम पंचायत निवडणुकीत यश मिळविले यावर यावेळी चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. निष्क्रिय कार्यकर्त्यांना घरचा रस्ता दाखवितानाच, निष्ठावान कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करण्यावर एकमत झाले. यापूर्वी काही जणांनी केवळ पदापुरता पक्षाचा वापर केला असून, हा प्रकार टाळण्यासाठी आता ‘आॅपरेशन क्लिन’ हाती घेण्याचा निर्णय झाला. बहुजनांच्या हितासाठी कार्य न करणाºयांना पक्षामधून पदमुक्त करू असे संकेत त्यानी दिले. ज्यांना केवळ पदाची ऊब घ्यायची आहे, त्यांना आता पदमुक्त करण्याची वेळ आली असून, नवे चेहरे पक्षात सक्रिय केले जाणार असल्याचे   संकेत आहेत. पुंजानी यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वच कार्यकारिणीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समीक्षा बैठकीला नगरसेवक व पदाधिकाºयांची उपस्थिती होती. भारिप बहुजन महासंघाने सध्या ‘आॅपरेशन क्लीन’  सुरू केले आहे. ‘नॉन परफॉर्मर’ पदाधिकाºयांचे लवकरच फेरबदल करून नवीन चेहºयांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी दिली. 

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ