भरदिवसा चार लाखाची चोरी
By Admin | Updated: March 27, 2015 01:36 IST2015-03-27T01:36:34+5:302015-03-27T01:36:34+5:30
रिठद येथील घटना.

भरदिवसा चार लाखाची चोरी
रिठद (वाशिम): येथील मुख्य रस्त्यानजिक असलेल्या घरात भरदिवसा घराचे कुलूप तोडून ४ लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना २६ मार्चला दुपारी २ ते २.३0 वाजताच्या दरम्यान घडली. रिसोड तालुक्यातील रिठद येथे मुख्य रस्ता वाशिम रिसोडवर संतोष शिवाजी आरू या शिक्षकाचे घर आहे. त्यांचे गावातही जुने घर असून, तेथे असलेल्या कार्यक्रमासाठी ते गेले असता चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडले व आत प्रवेश केला. कपाटातील २0 हजार नगदी रुपयांसह इतर सोन्या-चांदीचे दागिने मिळून जवळपास चार लाख रूपयांचा माल लंपास केल्याचे संतोष शिवाजी आरू यांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ताबडतोब घटनास्थळी पोलिसांचा ताफा व डॉग पथक पाचारण करण्यात आले होते. डॉग पथकाला चोर पकडण्यात मात्र अपयश आले. वृत्त लिहिस्तोवर या घटनेचा पंचनामा पोलीस करीत होते.