भारिपचे जिल्हा कचेरीवर धरणे

By Admin | Updated: July 13, 2017 19:54 IST2017-07-13T19:54:15+5:302017-07-13T19:54:15+5:30

वाशिम: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारिप व बौद्ध महासभेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Bharamp district should be held on the ground floor | भारिपचे जिल्हा कचेरीवर धरणे

भारिपचे जिल्हा कचेरीवर धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम -  मध्यप्रदेशमधील महू येथे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ५ जुलै रोजी हल्ला करण्यात आला. हा हल्ला म्हणजेच बहुजन चळवळ संपविण्याचा कट असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो.युसुफ पुंजानी यांनी केला आहे. या हल्ल्याचा निषेधात भारिपचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या नेतृत्वात भारिप व बौध्द महासभेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
भारिपचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनाला जिल्हा निरीक्षक एस.बी खंडारे,संध्याताई पंडीत, पी.एस.खंडारे, कळासरे,राजुभाऊ दारोकार, डॉ.रामकृष्ण कालापाड, मधुकर जुमडे, अनंत तायडे, विजय मनवर,अ?ॅड़.मारुख खान, कारंजाचे नगराध्यक्ष शेषराव ढोके,उपाध्यक्ष एम.टी.खान, जि.प.सदस्य मोहन महाराज, राजाभाऊ चव्हाण, निलेश भोजने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

Web Title: Bharamp district should be held on the ground floor